Garware Balbhavan, Pune, India.

You may view this responsive page on tablets & mobiles.

Must read articles by Shobha Bhagwat

Go ahead and send us your feedback on Facebook. Or simply send us a mail.

 

मानवी संस्कृतीचं ‘मूळ’

मुलांच्या संदर्भात कोणतीही गोष्ट आपण करत असलो तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं, जबाबदारीनं आणि जीव ओतून झाली पाहिजे. कारण ती आपण आपल्या मानवी संस्कृतीच्या ‘मुळासाठी’ करत असतो.

‘मूल’ म्हणजे मला मानवी संस्कृतीचं ‘मूळ’ वाटतं.

December 19, 2015

 

Read

मुलांच्या मनातला मोर

कशी आहेत आपली मुलं? शिक्षकांशी संवाद न करणारी, उदास, अलिप्त? उलट त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एक मोर दडला आहे. हातात निळा खडू मिळायचा अवकाश, समोरचा फळा तुझाच आहे, असं आश्वासन मिळायचा अवकाश की तो मनातला निळा मोर साकार होतो आणि थुई थुई नाचू लागतो. कोण शोधणार या मुलांच्या मनातल्या मोरांना?

December 5, 2015

 

Read

क्वालिटी टाइमच्या दिशेनं..

एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात. त्यांना तरी कुठे स्वत:ला क्वालिटी टाइम देता येतो? कामांच्या धावपळीतून आपल्याही जगण्याला क्वालिटी यावी असा प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.

Novenber 21, 2015

 

Read

मुलाचं आई-वडिलांना पत्र

एका मुलानं आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्याचे विचार त्यात व्यक्त केले आहेत. या पत्रातील मुद्दे सगळ्याच पालकांना त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबत मार्गदर्शक ठरतीलच. शिवाय त्याद्वारे त्यांची मुलं काय बरं सांगू पाहात आहेत हेही शोधण्यासाठी मदत करणारे आहेत. हे पत्र प्रत्येक पालकाच्या मनाचाच प्रतिध्वनी आहे.

October 24, 2015

 

Read

अनुभव हाच शिक्षक

संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर अनेक कल्पना सुचत राहतात. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो.

October 10, 2015

 

Read

मूल नावाचं सुंदर कोडं

मुलांना भाषा नवीन असते. ती अंदाजाने शब्दांचे अर्थ समजून घेत असतात. मुलांच्या मनातलं विश्व, त्यांनी लावलेले शब्दाचे अर्थ आपल्याला इतके अपरिचित असतात की दरवेळी असं काही नवं ऐकताना आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. ते समजून घेणं पालक म्हणून आपली जबाबदारी.

September 24, 2015

 

Read

ना हार ना जीत

मुलांबरोबरचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला ‘ना हार ना जीत’ असं म्हणतात. संतापलेल्या डोक्यांनी योग्य मार्ग कधीही निघणार नाही. मुलं काय आपली शत्रू आहेत का भांडण करायला? ती भांडण्याच्या पवित्र्यात असली तरी आपण हसून, मुलाच्या पाठीवर हात फिरवून समेट करावा.

August 29, 2015

 

Read

प्रश्नांना उत्तरं शोधू या

मुलांशी शांतपणे आणि ठामपणे बोलता यायला हवं, त्यातला निश्चय न रागावता मुलांपर्यंत पोचायला हवा. नाही तर काही पालक इतकं उडत-उडत बोलतात की ते मुलांपर्यंत पोचतच नाही. मुलं त्यांचं काहीच ऐकत नाहीत. अशा पालकांना ‘इनइफेक्टिव्ह पेरेंट’ म्हणतात. कोणत्याही प्रश्नाला हमखास असं एकच उत्तर नसतं. दहा उत्तरं, शक्यता असू शकतात, हे आपल्याला कळायला हवं..

August 15, 2015

 

Read

चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी..

चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो पलू आहेत. आत्मविश्वास, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता या सगळय़ांचे संस्कार आपल्यावर होत राहतील यासाठी प्रयत्न करायचा. संस्कार शिकवता येत नाहीत. ते नेणिवेत असतात. सवयी, शिष्टाचार शिकवता येतात ते जाणिवेत असतात.

August 1, 2015

 

Read

शाळांमधलं सुंदर – असुंदर

चांगल्या शाळा मुलांचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठा जपतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, आत्मसन्मान नाहीसा करत नाहीत, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकतात, मुलांचं पाहुण्यांबरोबर प्रदर्शन मांडत नाहीत. मुलांना शाळेत जायला मजा यायला हवी..

July 18, 2015

 

Read

शिक्षण म्हणजे..

शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. हे जाणून ज्यांनी शाळा व शिक्षण यांवर अनेक प्रयोग केले त्याविषयी..

July 4, 2015

 

Read

घरातली पिकली पानं

वय झालं की, चांगलं वागता यावं ही साधनाच असते, आणि वय झालेल्या माणसाशी चांगलं वागता येणं हा संस्कार असतो. खरं तर लहान मुलांसाठी जशी चांगल्या पाळणाघराची गरज वाढते आहे तशीच वयस्कर लोकांसाठी चांगल्या डे-केअर सेंटर्सचीही गरज आहे.. कारण समाजाची नीतिमत्ताही समाज मुलांसाठी आणि वृद्धांसाठी काय करतो यावरच अवलंबून असते ना?

June 20, 2015

 

Read

कुठेतरी बी रुजतंच रुजतं!

आमच्या प्रौढ शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल तर पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल होतं. ती सांगत होती, ‘बाई तुम्ही शिकविल्याली गानी मी याला म्हनून दाखवते. आन कामं का करायला लागंनात मी याला शिकिवनार म्हंजी शिकिवनारच. हे बघा येक पुस्तकबी म्या इकत आनलं याच्यासाठी.’

June 6, 2015

 

Read

रोज नवा साक्षात्कार!

वंचितांचं जग समजलं तर आपली पालकत्वाची सामाजिक जबाबदारी उचलता येते. ही आपलीच माणसं आहेत. त्यांचा जगण्याचा झगडा जीवघेणा आहे, हे आपण समजून घेऊ या आणि मुलांनाही समजावून देऊ या. निदान आपली मुलं तरी वंचित मुला-माणसांबद्दल बेपर्वा व्हायला नकोत.

May 23, 2015

 

Read

चला करू थोडा पसाराही!

‘आपण ‘आहोत’ तसं ‘असणं’ खासच असतं. पसारा करणं तर आवश्यक असतं. तो नंतर आवरून टाकला की झालं. नवीन काही निर्माण करायचं तर थोडा पसारा, थोडा कचरा, थोडा चिकचिकाट होणारच!’ – अ‍ॅन सायर वाइजमनचं हे म्हणणं मुलांना कृतिशील बनवणारं आहे.

May 9, 2015

 

Read

रागाचं काय करायचं?

राग आला म्हणून वाट्टेल ते बोलायचं नाही. बोलण्यापूर्वी थोडा विचार करायचा. दहा आकडे मोजा म्हणतात, ते यासाठी. या क्षणभरच्या विचारात हा राग का आला बरं? कशाचं एवढं वाईट वाटलं असेल? याचा विचार करायचा. एकदा रागाचा पारा खाली आला की विचार करता येतो, आपल्या मनात कोणत्या काळज्या आहेत? आपल्याला का निराशा आली? हे स्पष्टपणे बोलता येतं. समोरच्याला न दुखावता सांगता येतं.

Read

अनुभवांचं जग

प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. शाळेत ठरावीक विषयच असल्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करता यायला हव्यात, अनुभवून पाहता यायला हव्यात.

Read

मुलांना मारू नका

प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं तो हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, ''याची जरूर आहे का?'' ९९ टक्के वेळा उत्तर मिळेल, 'जरूर नाही. समजावून सांग.''

Read

संवादाची भाषा

मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही. उलट बोलणं, परस्पर खर्च करणं, मुला-मुलींची एकमेकांबद्दल ओढ, त्यांचे कपडे, आपल्याला सगळ्याचाच राग येतो, काळजी वाटते. या सगळ्या काळात आपण जवळीक निर्माण करण्याऐवजी दुरावा निर्माण करतो.

Read

मुलांमधील गुण

मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही. काटकसरी वस्तू वापरण्याची सवय असली की मन हे शोधत राहतं, आपण उधळपट्टी तर करत नाही ना? स्वत:ला अनेक दिवस हे शिकवावं लागतं. ते अचानक होत नाही.

Read

घर काय काय देतं?

घरावर केवढी मोठी जबाबदारी असते. घरी आलं की छान वाटलं पाहिजे. स्वस्थ, शांत वाटलं पाहिजे. दडपणं उडून गेली पाहिजेत. ते कशानं घडतं? आई- वडिलांच्या डोळ्यांत दाटून आलेल्या प्रेमानं, त्यांच्या स्पर्शातून, मुलांसाठी सतत धडपडत राहणाऱ्या त्यांच्या स्वभावातून.

Read

पालक अर्थात 'संपूर्ण माणसं'

घरात बाबांची जागा नुसते पैसे मिळवून सिद्ध होणार नाही तर आपल्या मुला- माणसांवर प्रेम करणं, संसारातल्या जबाबदाऱ्या समजणं, आत्मकेंद्रित न राहणं यातून घरं पूर्ण होतील. मुलांना आई आणि वडील ही 'संपूर्ण माणसं' पालक म्हणून मिळूदेत. हा पालकत्वातला महत्त्वाचा धडा आहे.

Read

मुलांची 'माणसं' करताना..

मुलांची 'माणसं' करणं हे शास्त्र आहे, ती कला आहे. हे महत्त्वाचं काम आहे आणि तो स्वत:च्या विकासाचाही भाग आहे. पालकत्वाचा हा अर्थ समजून घ्या. मघ बघा, काय जादू होते ती. कारण मुलांवर प्रेम करा हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांना सन्मानानं वागवा हे माहीत नसतं.!

Read

हरवत चाललेलं अवकाश

आजची आपली मुलं निसर्ग, खेळ, भाषा, माणसांचं प्रेम, साधं अन्न, सुती कपडे यांचं सुख गमावत आहेत. शांती गमावत आहेत. त्यांचा अवकाश हरवत चालला आहे. खेळ बंद होत आहेत. मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड, टी.व्ही. यांनी ती पोकळी भरणं शक्य नाही. मग पालकांनी करायचं तरी काय?

Read

गरज आजी-आजोबांची

आजी - आजोबांशिवाय घर पुरं होत नाही. एकदा एका मुलीनी चित्रात छान घर, त्यात आई-बाबा, तिचा भाऊ, ती, आजी-आजोबा, मोठा कुत्रा, मनी, ड्रायव्हर काका, कामाच्या बाई असं सर्वांचं चित्र काढलं. बाई म्हणाल्या, "असं नसतं कुटंब. आई, बाबा, तू आणि तुझा भाऊ एवढंच चित्र काढ."

Read

बालभवनातलं शिक्षण

education in balbhavan

Read

Expanding young minds

Read

गरवारे बालभवनने दिला आयुष्याला नवाआयाम

Read

पंचविशी एका हसऱ्या स्वप्नाची

Read

पालकांना शहाणपण देगा देवा

Read